Marathi Ukhane For Female | मराठी उखाणे नवरीसाठी महाराष्ट्रामध्ये विवाह हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सोहळा असतो. या सोहळ्यातील अनेक प्रथा आणि परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. यापैकीच एक खास आणि मनोरंजक परंपरा म्हणजे नवरीने (नववधूने) Marathi Ukhane For Female | मराठी उखाणे नवरीसाठी घेणे. उखाणे म्हणजे छोटी, लयबद्ध काव्यपंक्ती, ज्यामध्ये नवरी आपल्या पतीचे नाव मोठ्या खुबीने आणि विनोदी अंदाजात घेते. ही परंपरा केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर त्यामागे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व दडलेले आहे.
Marathi Ukhane For Female | मराठी उखाणे नवरीसाठी घेण्याची प्रथा महाराष्ट्रात फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. जेव्हा नववधू सासरच्या घरी प्रवेश करते, तेव्हा तिची ओळख करून देण्यासाठी आणि घरातील लोकांशी संवाद साधण्यासाठी उखाणे घेतले जातात. यामुळे नववधूला कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधायला मदत होते आणि वातावरणात एक प्रकारचा खेळीमेळीचा आणि आनंदाचा रंग भरला जातो.
उखाण्यांची रचना सहसा दोन ओळींची असते. पहिली ओळ एखाद्या सामान्य वस्तूचे, निसर्गरम्य दृश्याचे किंवा परिचित गोष्टीचे वर्णन करते. दुसरी ओळ त्या पहिल्या ओळीतील शब्दांशी यमक जुळवते आणि याच ओळीत नवरी आपल्या पतीचे नाव अत्यंत कलात्मक पद्धतीने घेते. काही उखाण्यांमध्ये प्रेमळ भावना व्यक्त केल्या जातात, तर काही उखाणे विनोदी आणि मजेदार असतात. नवरी आपल्या स्वभावानुसार आणि परिस्थितीनुसार योग्य Marathi Ukhane For Female | मराठी उखाणे नवरीसाठी उखाण्याची निवड करू शकते.
Marathi Ukhane For Female
आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून,
_रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून.

चाफा बोलेना, चाफा चालेना,
_च माझ्याशिवाय, पानच हलेना.

संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन,
_रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.

आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याचा पट्टा,
_रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा.

उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणता___ आणि___ ची जोडी आहे जबरदस्त.

तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी,
_रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.

सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,
_रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.

मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार,
_रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
…. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

बारीक मणी घरभर पसरले,
…… साठी माहेर विसरले.

लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.

रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
…. च्या साथीने आदर्श संसार करीन.

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.
…. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.

चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.
….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
…. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।
…..रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.

अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,
…. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!

अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,
………..रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा

दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,
……रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,
……………राव मला मिळाले आहेत ते अनुरूप

बारीक मणी घरभर पसरले, बारीक मणी घरभर पसरले,
_ साठी मी माझे माहेर विसरले.

सुरु झालाय श्रावण, करते मी महादेवाची मनोभावे पूजा,
सुरु झालाय श्रावण, करते मी महादेवाची मनोभावे पूजा,
__च्या जीवावर आता करते मी मजा.

अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वांग्याची फोड,
अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वांग्याची फोड,
_ हसते/हसतात गोड, पण डोळे वातारायची आहे भारीच खोड.

नवे घर, नवे लोक, नव नवी नाती,
संसार होईल मस्त, _राव असता सोबती.

लक्ष्मी शोभते दानाने, विद्या शोभते विनयाने,
_रावांच्या जीवावर मी राहते मानाने.

माझा नमस्कार फुकाचा, तुमचा आशीर्वाद लाख मोलांचा,
_रावांचं नाव घेते, संसार होवो सुखाचा.

समुद्राला आली भरती, नदीला आला पूर,
_रावांच्या साठी, मी माहेर केले दूर.

नको मोती, नको चंद्रहार,
_रावांच नाव, हाच मला खरा अलंकार.

गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून,
रावांचे नाव घेते _ ची सून.

उंच मनोरे, नव्या जगाचे,
__ रावांमुळे भेटले मला, हे दिवस सुखाचे.

रंग हे नवे, गंध हे नवे,
__ रावांची साथ, मला ७ जन्मी हवे.

हा लाख मोलाचा ऐवज सारा, मी तुमच्या हवाली करते,
__ राव मला नको अजून काहि, मी फक्त तुमच्यावर मरते.

तू आहेस माझा श्वास आणि माझ्या हृदयाचे ठोके,
_ रावांचे नाव घेते, पाहुणे मंडळी आहेत ना सर्व ओके.

यांच्या नजरेची, जादू माझ्यावर पडली,
खूप स्थळ दाखवले घरच्यांनी पण मी _ रावांवरच अडली.

नक्षीदार अशा सुंदर मंडपी, जमली सारी थोर मंडळी,
_ रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, जमली आमची कुंडली.

सोहळे होतात ऋतूंचे सर्व, त्यांच्या तरेने,
_ रावांसोबत लग्न झाले, दोन्ही कुटुंबाच्या म्हणण्या प्रमाने.

यांना मी जीवनसाथी निवडले म्हणून, नातेवाईकांना वाटत होते मी केला मोठा गुन्हा,
पण __ राव हवेत मला जोडीदार म्हणून, सात जन्मी पुन्हा.

घालते मी शुभप्रभाती, पाणी तुळशीला,
_ रावांनी मला, बायको करून आणली मुळशीला.

आई-वडिलांच्या पुण्याईने, भेटले मला हे स्थळ,
_ रावांचे नाव घेते, त्यांना बघताच येते माझ्या अंगात बळ.

स्वप्नात पहिले जे, ते रूप हेच होते,
_ रावांचे नाव आज, सर्वांसमोर घेते.

हे पण वाचा : आई, हे दोन अक्षरी नाव, पण त्यातच साऱ्या जगाचे प्रेम सामावलेलं आहे. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक भावना आहे, एक आधार आहे, एक शक्ती आहे. आई ही आपल्या जीवनातील पहिली शिक्षिका, पहिली मैत्रीण आणि पहिली रक्षक असते. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा.
दासांचाही दास श्रीहरी, नंदाचा नंदन,
_ रावांचे नाव घेऊन करते, तुम्हा सर्वांना वंदन.

शब्दही न बोलता, साद घातली कुणी,
_ राव आहेत, माझ्या दिलाचे धनी.

रंग हे नवे, गंध हे नवे,
_रावांची साथ, मला सात जन्मी हवे.

जीवनाच सोन करेन मी, सगळ सुख मी तुला देईन,
__ रावांचे नाव आजपासून मी, सगळीकडे घेईन.

सूर्याने दिली साडी, चोळी आणि गोफ,
__ रावांच्या मांडीवर __ घेते झोप.

आंबे वनात, कोकिळा गाते गोड,
_ रावांचे नाव घेते, वैनी वाट माझी सोड.

लग्नासाठी मुले पाहिले, सतराशे साठ,
अखेर __ रावांशी बांधली, लग्नाची गाठ.

रात्रीच्या आकाशात, चमचमते तारे,
__ रावांचे नाव घेते, लक्ष द्या सारे.

आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार,
__ रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार.

प्रेम काय आहे, हे माहित नव्हते मला,
ते खूप सुंदर आहे, हे _रावांमुळे कळले मला.

कपाळावरील कुंकू, मांगल्याची खूण,
__ रावांची आणि माझे, जुळले, ३६ गुण.

दादरला गेलो बांधायला, लग्नाचा बस्ता,
__ रावांचे नाव घेते, आता सोडा माझा रस्ता.

रत्नागिरीला आहे देवस्थान, गणपतीपुळे,
कोकणामध्ये सासर भेटले _ रावांमुळे.

संगमरवरी देवळात बसविली, साईंची मूर्ती,
__ रावांशी लग्न झाले, झाली इच्छा पूर्ती.

श्रीविष्णूच्या मस्तकावर, सदैव असतो शेष,
__ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश.

नव्हत्या माहित मला, जन्मातरींच्या गाठी,
__ देवाने बनवलंय तुला, माझ्याच साठी.

असंख्य तारे, नभात पहावे निरखून,
_ रावांसारखे पती, वडिलांनी दिले पारखून.

शब्द तिथे नाद, कवी तिथे कविता,
_ रावांची जोड जणू, सागर आणि सरिता.

सोहळे होतात ऋतूंचे सर्व, त्यांच्या तरेने,
__ रावांसोबत लग्न झाले, दोन्ही कुटुंबाच्या म्हणण्या प्रमाने.

यांना मी जीवनसाथी निवडले म्हणून, नातेवाईकांना वाटत होते मी केला मोठा गुन्हा,
पण __ राव हवेत मला जोडीदार म्हणून, सात जन्मी पुन्हा.

गोकुळच्या गोड गाण्यात, राधा कृष्णाचा साज सजला,
_ रावांचे नाव घेते, आयुष्यभराची साथ भेटली मजला.

तुझ्यामुळे माझ्या, हृदयाला मिळते शांती,
_रावांमुळे माझ्या, आयुष्यात आली क्रांती.

जन्मात एक झाली, हि प्रितभेट देवा,
_ राव मला साथ जन्मी, तुमचीच पत्नी ठेवा.

उंच मनोरे, नव्या जगाचे,
_ रावांमुळे भेटले मला, हे दिवस सुखाचे.

समोर येताच तुमचा चेहरा, बघून काळजाचा चुकतो ठोका,
_रावांचे सर्वांसमोर नाव घेण्याचा, भेटला आज मोका.

आई वडिलांपेक्षा, नाही मोठी कोणाची माया,
__ रावांच्या सानिध्यात येऊन, भेटली मला छाया.

लग्नासाठी मुले पाहिले, सतराशे साठ,
अखेर __ रावांशी बांधली, लग्नाची गाठ.

गुलाबाचे फुल, गणपती बाप्पाला वाहिले,
_ च्या साठी, गाव पाहिले.

मंदिराच्या गाभाऱ्यात, विठ्लाची मूर्ती,
_ रावांची होवो, सगळीकडे कीर्ती.

रात्रीच्या आकाशात, चमचमते तारे,
_ रावांचे नाव घेते, लक्ष द्या सारे.

आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार,
_ रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार.

आषाढी कार्तिकी, पंढरपूरची वारी,
__ च नाव घेतो, राम कृष्ण हरी.

रखरखत्या वैशाखात, प्रेमाचा धुंद वारा,
जीवनाचा खेळ समजला, __ मुळे सारा.

चालली सप्तपदीचे, सात पावले,
_ रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधले.

Pinterest Images साठी येथे क्लिक करा.