Good Morning Message in Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश “शुभ सकाळ” हे केवळ दोन शब्द नाहीत, तर एक प्रेमळ शुभेच्छा आहे जी प्रत्येक नवीन दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी दिली जाते. सकाळचा वेळ म्हणजे नव्या ऊर्जेचा, नव्या विचारांचा आणि नव्या संधींचा आरंभ होय. आपला दिवस खूप चांगला आणि आनंददायी वातावरणासह आणि शुभ सकाळ शुभेच्छासह सुरू व्हावा अशी आपल्या सर्वांना इच्छा असते. जेव्हा आपला दिवस चांगल्या आनंदी मनाने सुरू होतो तेव्हा आपले मन दिवसभर आनंदी होते आणि आपले सर्व कार्ये देखील होतात.
प्रत्येक नवीन दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी झाली तर संपूर्ण दिवस आनंदात जातो. Good Morning Message in Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश म्हणजे फक्त एक greeting नव्हे, तर आपल्या प्रियजनांप्रती प्रेम, काळजी आणि सकारात्मकतेची भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे मराठी शुभ सकाळ संदेश – प्रेरणादायी, प्रेमळ, हास्यविनोदयुक्त आणि खास तुमच्या कुटुंबीय व मित्रांसाठी. हे मेसेज तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram किंवा status म्हणून सहज पाठवू शकता. चला तर मग, तुमच्या दिवसाची सुरुवात एका सुंदर शुभेच्छेने करूया!
Good Morning Message in Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश
सकाळच्या या प्रसंगी माझी
अशी इच्छा आहे की,
आपली नाती वाऱ्यासारखी असावीत,
जरी ती दिसत नसली
तरी त्यात मायेची उब कायम असावी.
ती शब्दांत सांगता येणार नाही
इतकी आपुलकी आणि
जिव्हाळ्याने भरलेली असावी.
शुभ प्रभात
विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
शुभसकाळ

कोवळे किरण देतात प्रेमळ हाक,
मंद वारे करतात हळुवार स्पर्श.
तुमच्या जीवनात दररोज येवो,
आनंददायी आणि सुखद सकाळ.
!! शुभ प्रभात !!
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे नाव आणि इज्जत…
शुभसकाळ

माणसाचा स्वभाव मुक्त वाय-फायसारखा असावा,
ज्यासाठी कोणत्याही पासवर्डची आवश्यकता नसावी;
लोक सहजच जोडले जावेत.
कारण, प्रभावी व्यक्तिमत्त्वापेक्षा उत्तम स्वभाव अधिक महत्त्वाचा आहे.
शुभ प्रभात
दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभसकाळ

सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतो
दुःख तुम्हाला माणूसकी शिकवते
अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते
यश तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी देते
परंतु इच्छाशक्तीच तुम्हाला ध्येय्य
साध्य करण्याची प्रेरणा देते.
Good Morning
लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा….
तुमच्यासारखी गोडं माणसं.
शुभसकाळ

या जगात वाट दाखवणार अनेकजण असतात,
पण चालणारे आपण एकटेच असतो…..
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात
पण मदतीचा हात देणारे ते
फक्त जिवलगच असतात……
GOOD MORNING
आयुष्य खूप सुंदर आहे,
उतुंग भरारी मारा,
ढगा आढ उडणाऱ्या गरूडाला
पण तुमचा हेवा वाटला पाहिजे
इतके मोठे व्हा, आमच्या शुभेच्छा
सदैव तुमच्या पाठीशी आहेत
शुभसकाळ

देवाने प्रत्येकाच आयुष्य
कसं छान पणे रंगवलय
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य रंगवताना
देवाने सोन्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय!
शुभ सकाळ
शिस्तीशिवाय जीवन म्हणजे
देवावीनं देऊळ सुंदर दिवसाची पहाट,
सुंदर विचाराने
शुभ सकाळ

माणूस एकदा देव म्हणाला
तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन
देव म्हणतो माणसाला
एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव
रूप त्यांच्यातच असेल!!!!!
!! शुभ सकाळ !!
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
शुभ सकाळ

खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.
!! शुभ सकाळ !!
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
शुभसकाळ

“चांगलेच होणार होणार आहे” हे
हे गृहीत धरून चला,बाकीचे
परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास
मनात असला की येणारा प्रत्येक
क्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!!
!! शुभ सकाळ !!
कोणी कितीही घेरलं तरी
स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करता यायला पाहिजे
शुभसकाळ

“रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख-दुःखाची नाणी फेकत असतो”
ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात,
तो सुखाचा व्यापार करतो.
सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
शुभ सकाळ
पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला …
तुमची आठवण येत आहे असा
निरोप देऊन गेला
शुभसकाळ

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही
शुभ सकाळ
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी,
हि सकाळ आपल स्वागतं करत आहे

मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हांच होतो
जेव्हा ते उघडले जातात..
नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते
शुभ सकाळ
जर यशाच्या गावाला जायचे असेल तर
अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागेल
शुभसकाळ

कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात
शुभ सकाळ
आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे
जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे
त्याचा सुयोग्य वापर करा
जग अपोआप सुंदर बनत

तुम्ही तीच गोष्ट गमावता
ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता
शुभ सकाळ
हे पण वाचा :
Happy Birthday For Mother
आई, हे दोन अक्षरी नाव, पण त्यातच साऱ्या जगाचे प्रेम सामावलेलं आहे. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक भावना आहे, एक आधार आहे, एक शक्ती आहे. आई ही आपल्या जीवनातील पहिली शिक्षिका, पहिली मैत्रीण आणि पहिली रक्षक असते.
तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा.
Marathi Ukhane For Female
महाराष्ट्रामध्ये विवाह हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सोहळा असतो.
या सोहळ्यातील अनेक प्रथा आणि परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत.
यापैकीच एक खास आणि मनोरंजक परंपरा म्हणजे नवरीने (नववधूने) Marathi Ukhane घेणे.
त्यासाठी Marathi Ukhane For Female येथे क्लिक करा.
आपला आजचा दिवस आनंदात जावो
यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खूप मोठा, स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ शुभसकाळ

सुप्रभात
तेजस्वी सूर्याची किरणं
देवोत तुम्हाला ऊर्जा,
नव्या दिवसाच्या तुम्हाला
गोड गोड शुभेच्छा!
तीच नाती फार छान असतात ज्यात
मी/आम्ही नव्हे; आपण असतो.. शुभसकाळ

सुप्रभात
उडणारा फुगा आपल्याला
एक धडा शिकवतो.
बाहेर जे आहे ते नाही,
तर आत जे आहे
ते आपल्याला वर घेऊन जाते.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…
शुभसकाळ

एकच आस, एक विसावा
तुझा मेसेज रोज दिसावा
परमेश्वराकडे हिच प्रार्थना
तुझा सहवास कायम मिळावा – शुभ सकाळ
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तरी जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे
शुभसकाळ

येणारी प्रत्येक सकाळ इतकी रम्य असावी
तुझी चिंता काळजी सर्व काही दूर पळून जावी
येणारा प्रत्येक दिवस आनंद आणि उत्साहाचा असावा
तुझ्या खूष असण्याचा सर्वांनाच हेवा वाटावा – शुभ सकाळ
शुभसकाळ
अडचणी आयुष्यात नव्हे,
तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…

आकाशाला पुन्हा तांबडा रंग फुटलाय
पांढऱ्या धुक्यातून सूर्य वर आलाय
माझ्या मनात आनंदाचं सुंगध दरवलाय
कारण तुला भेटण्यासाठी आज पुन्हा नवा दिवस उगवलाय शुभ सकाळ
प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी गुंफलेली कविता,
जाणिवेच्या पलीकडच जगावेगळ गाव,
यालाच तर आहे आयुष्य हे नाव
तुमचा दिवस सुखाचा जावो
शुभसकाळ

प्रत्येक पहाट दररोज तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते
झोपून स्वप्न पाहा किंवा उठून तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा
शुभ सकाळ
माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने,
कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर,
एखादे वेळेस साथ देणार नाही ,
पण माणुसकी प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही
तुम्हाला एकटे पडू देणार नाही…
शुभसकाळ

आरसा आणि ह्रदय
दोन्ही तसे नाजूक असतात
फरक एवढाच…
आरशात सगळे दिसतात
आणि ह्रदयात फक्त आपलेच दिसतात
शुभ सकाळ
मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतात
त्यांच्याशीच मनांची
खोल नाती जुळतात
शुभसकाळ

खेळ शिकायचा असेल तर बुद्धीबळाचा शिका
कारण त्यात एक चांगला नियम आहे
आपली माणसं आपल्याच
माणसांचा कधीच पराभव करत नाहीत
शुभ सकाळ
पहाटे पहाटे मला जाग आली,
चिमण्यांची किलबिल कानी आली,
त्यातील एक चिमणी हळूच म्हणाली,
कुटवाड दुध प्यायची वेळ झाली.
शुभसकाळ

शुभ सकाळ
दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा.
तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील
एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभसकाळ
म्हणल्या शिवाय राहवत नाही

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक उन्हाची प्रेमळ साथ
मंजुळ वाऱ्याची हळूवार हालचाल
अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ
तुम्हा सर्वांना – शुभ सकाळ
नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो न बदलो
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभसकाळ

अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात फिरताना सावलीची गरज असते
जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते
माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळ
सुंदर विचार…
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या, चांगलच मिळेल
शुभसकाळ

येणारी प्रत्येक सकाळ इतकी रम्य असावी
तुझी चिंता काळजी सर्व काही दूर पळून जावी
येणारा प्रत्येक दिवस आनंद आणि उत्साहाचा असावा
तुझ्या खूष असण्याचा सर्वांनाच हेवा वाटावा – शुभ सकाळ
मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध हा येणारच,
आणि आपली माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच…
शुभसकाळ

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!
शुभ सकाळ
कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
|| शुभ सकाळ ||
जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते….
“लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं”..
“मग ती वस्तु असो वा”….
“तुमच्यासारखी गोडं माणसं”…
“शुभ सकाळ”
Pinterest Images साठी येथे क्लिक करा.
3 thoughts on “50 Good Morning Message in Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश”