Homemade Face Pack for Oily Skin | तेलकट त्वचेसाठी घरगुती फेस पॅक आजकाल अनेकांना ऑइल स्किन (Oily Skin) ची समस्या भेडसावते. सतत चेहरा तेलकट दिसणे, पिंपल्स होणे, धूळ व घाण पटकन चेहऱ्यावर बसणे हे सगळं त्रासदायक ठरतं. बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स तात्पुरता फायदा देतात पण दीर्घकाळात त्वचेला हानी पोहोचवतात. म्हणूनच आज आपण Homemade Face Pack for Oily Skin | तेलकट त्वचेसाठी घरगुती फेस पॅक मध्ये काही सोपे, नैसर्गिक व घरगुती उपाय पाहूया.
ऑइल स्किनची कारणे (Causes of Oily Skin)
- हार्मोनल बदल
- चुकीचा आहार व जंक फूड
- पुरेसे पाणी न पिणे
- तेलकट क्रीम व लोशनचा वापर
- झोपेची कमतरता
ह्या कारणांमुळे त्वचेतील oil glands जास्त प्रमाणात तेल (Sebum) तयार करतात.
Homemade Face Pack for Oily Skin तेलकट त्वचेसाठी घरगुती फेस पॅक

बेसन आणि लिंबाचा फेस पॅक
साहित्य: २ चमचे बेसन, काही थेंब लिंबाचा रस, गुलाबपाणी
कृती: हे एकत्र करून पेस्ट तयार करा व १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा.
फायदा: जास्त तेल नियंत्रणात राहते आणि चेहरा उजळतो.

मलई आणि हळदीचा फेस पॅक
साहित्य: १ चमचा मलई, चिमूटभर हळद
कृती: चेहऱ्यावर लावून १० मिनिटांनी धुवा.
फायदा: Pimples कमी होतात व त्वचा मऊसर होते.

टोमॅटो आणि मधाचा फेस पॅक
साहित्य: अर्धा टोमॅटो, १ चमचा मध
कृती: पेस्ट बनवून चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवा.
फायदा: तेलकटपणा कमी होतो, pores टाईट होता

मुलतानी माती फेस पॅक
साहित्य: २ चमचे मुलतानी माती, गुलाबपाणी
कृती: पेस्ट करून चेहऱ्यावर लावा व सुकल्यावर धुवा.
फायदा: जास्त तेल शोषून घेते आणि चेहऱ्याला थंडावा देते.
हे पण वाचा :
प्रत्येक स्त्री-पुरुषाला आपली त्वचा सुंदर, उजळ व चमकदार दिसावी असे वाटते. बाजारात अनेक महागडी क्रीम्स, फेसवॉश किंवा ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत, पण त्यामध्ये केमिकल्स असल्यामुळे दीर्घकाळाने त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच नैसर्गिक घरगुती उपाय हे त्वचेच्या दृष्टीने अधिक सुरक्षित व परिणामकारक ठरतात. चला तर मग पाहूया, Face Glow Tips Marathi | त्वचा उजळण्यासाठी घरगुती उपाय येथे क्लिक करा

मसूर डाळ फेस पॅक
साहित्य: २ चमचे मसूर डाळ (रात्रभर भिजवलेली), १ चमचा दही
थोडे गुलाबपाणी
कृती:
मसूर डाळ बारीक वाटून घ्या. त्यात दही आणि गुलाबपाणी मिसळा.
चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा.
फायदा
त्वचेतील जास्त तेल कमी होते.
Skin Exfoliate होते.
चेहरा ताजेतवाने दिसतो.

ओट्स आणि दही फेस पॅक
ओट्स बारीक करून दह्यात मिसळा.
चेहऱ्यावर लावून १० मिनिटांनी धुवा.
फायदा: Oil control + Dead skin साफ होते.

काकडी व लिंबू फेस पॅक
काकडीच्या रसामध्ये लिंबाचे काही थेंब टाकून
चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा.
फायदा: चेहऱ्याला थंडावा मिळतो व Oil balance राहते

कोरफड जेल फेस पॅक
ताज्या कोरफड जेलमध्ये गुलाबपाणी मिसळा.
फायदा: Pimples कमी होतात, skin glow करते.

अंड्याचा पांढरा भाग
अंड्याचा पांढरा भाग फेसवर लावा.
१० मिनिटांनी धुवा.
फायदा: त्वचेतील तेलकटपणा कमी होतो, pores टाईट होतात.

सफरचंदाचा रस
सफरचंदाचा किस करून त्याचा रस चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी धुवा.
फायदा: नैसर्गिक क्लेंझर, तेल व घाण दूर करतो.

चंदन पावडर व गुलाबपाणी
२ चमचे चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा.
चेहऱ्यावर लावा व सुकल्यावर धुवा.
फायदा: तेल शोषून घेते, त्वचेला थंडावा देते, Pimples कमी करते.

पपई पल्प फेस पॅक
पिकलेल्या पपईचा पल्प चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा.
कोमट पाण्याने धुवा.
फायदा: Skin exfoliate होते, तेलकटपणा कमी होतो, नैसर्गिक glow येतो.
हे उपाय अगदी सोपे व सुरक्षित आहेत. आठवड्यातून २-३ वेळा वापरले तर तेलकट त्वचेवर नियंत्रण, तेलकट त्वचा स्वच्छ, फ्रेश व तजेलदार दिसेल नैसर्गिक उपायांनीच दीर्घकाळ परिणाम मिळतात
Oily skin साठी घरगुती face pack सोबत योग्य face wash वापरला तर अधिक परिणामकारक होतो.”
BEST FACE WASH FOR OILY SKIN
Himalaya Neem Face Wash – पिंपल्ससाठी उत्तम
Himalaya Purifying Neem Face Wash | Clears and Prevents Pimples & Acne | Made with 5 parts of Neem | New & Best Ever clinically Proven formula|Gently Cleanses | For men and women|400 ml

Mamaearth Tea Tree Face Wash – Natural ingredients
Mamaearth Tea Tree Oil Control Face Wash with Tea Tree & Neem for Normal to Oily Skin – 150 ml Up to 12 Hrs Oil Control | Cleanses Gently | Controls Acne & Pimples

Cetaphil Oily Skin Cleanser – Dermatologist recommended
Cetaphil Oily Skin Cleanser, Daily Face Wash For Oily, Acne Prone Skin, Gentle Foaming, 250Ml

तेलकट चेहर्यासाठी उपाय (जीवनशैली)
ऑइल स्किनसाठी खास टिप्स (Daily Care Tips)
दिवसातून 2-3 वेळा चेहरा धुणे
जास्त तेलकट अन्न टाळणे
नेहमी oil-free moisturizer वापरणे
भरपूर पाणी पिणे
FAQ Section (Frequently Asked Questions) – Homemade Face Pack for Oily Skin
Q1. तेलकट त्वचा म्हणजे काय?
Ans : तेलकट त्वचा म्हणजे चेहऱ्यावरचे oil glands (sebaceous glands) जास्त प्रमाणात sebum नावाचे नैसर्गिक तेल तयार करतात. त्यामुळे चेहरा नेहमी चमकदार दिसतो, पिंपल्स/ब्लॅकहेड्स होतात आणि त्वचा तेलकट राहते.
Q2. तेलकट त्वचेसाठी कोणते घरगुती फेस पॅक उपयुक्त आहेत?
Ans : बेसन-लिंबू फेस पॅक, टोमॅटो-मध फेस पॅक, मुलतानी माती पॅक आणि हळद-मलई पॅक हे सर्व 10 Homemade Face Pack for Oily Skin | तेलकट त्वचेसाठी घरगुती फेस पॅक मध्ये खूप फायदेशीर आहेत.
Q3. तेलकट त्वचेसाठी फेस पॅक किती वेळा लावावा?
Ans : आठवड्यातून २ ते ३ वेळा फेस पॅक लावल्यास उत्तम परिणाम मिळतात. रोज लावण्याची गरज नाही.
Q4. तेलकट त्वचेचे मुख्य कारण काय असते?
Ans : हार्मोनल बदल, जास्त तेलकट अन्न, उष्ण हवामान, पुरेसे पाणी न पिणे, चुकीची स्किनकेअर प्रॉडक्ट्स यामुळे तेलकट त्वचा होते.
Q5. तेलकट त्वचेवर moisturizer वापरावा का?
Ans : हो! पण नेहमी oil-free, gel-based moisturizer वापरा. हे त्वचेला hydration देते पण तेलकटपणा वाढवत नाही.
Q6. तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींनी मेकअप वापरावा का?
Ans : हो, पण oil-free, non-comedogenic products वापरणे आवश्यक आहे. मेकअप लावल्यावर झोपण्यापूर्वी नीट facewash करून साफ करणे खूप महत्त्वाचे आहे.
Q7. तेलकट त्वचा पूर्णपणे बरी होऊ शकते का?
Ans : तेलकट त्वचा ही नैसर्गिक skin type आहे. ती पूर्णपणे बदलता येत नाही, पण योग्य आहार, स्किनकेअर routine आणि घरगुती उपायांमुळे ती नियंत्रणात ठेवता येते.
Pinterest Images साठी येथे क्लिक करा.
1 thought on “10 Homemade Face Pack for Oily Skin | तेलकट त्वचेसाठी घरगुती फेस पॅक”